Loading...
गोदावरी कन्सल्टंट आणि सर्विसेस या परिवारामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. २०२३
गोदावरी कन्सल्टंट आणि सर्विसेस या परिवारामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. २०२३
25 September 2023

दिनांक 08/03/2023 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 साजरा करण्यात आला. जसे आपण सर्व जाणतो की आपल्या जीवनात महिलांची भूमिका महत्त्वाची असते. मग ती भूमिका आपल्या आईची असो किंवा बहीण किंवा पत्नीची!! प्रत्येक क्षणाला महिलांचा पाठिंबा नक्की मिळतो ,परंतु त्यांच्या कार्याबद्दल आपण त्यांचा गौरव करतो, असे फार कमी वेळा घडते. अशा परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला आपल्या जीवनातील महिलांना त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या भूमिकेसाठी सन्मानित करण्याची संधी देतो. याचेच औचित्यसाधून आमच्या गोदावरी कन्सल्टंट आणि सर्विसेस या परिवारामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नितीन सोनवणे होते, तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री केतन कडवे यांनी केले. महिला दिनाच्या शुभेच्छा आमचे सहकारी गोकुळ आणि इतर सदस्यांनी  दिल्या.
तसेच सन्मान करतांना  आमचे कंपनीचे संचालक श्री राहुल महाजन ,अजिंक्य काळे,  वैभव भावसार, आणि सन्मान स्वीकारतांना वृषाली मोरे-वाघ, हर्षदा शेवाळे आणि गौरी सूर्यवंशी.ह्या प्रसंगी वृषाली मोरे ह्यांनी आभार प्रदर्शन केले.

.

We Serve Excellence.