पद्मश्री चैत्राम पवार साहेबांचा हुतात्मा स्मारक नाशिक येथे एन. जी.ओ. फोरम व सक्सेस ग्लोबल फाउंडेशन यांच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न...
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" ही संत तुकारामांनी दिलेली शिकवण भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. आपला समाज निसर्गपूजक आहे आणि परंपरेने आपण झाडांना, प्राण्यांना, नद्यांना आणि पर्वतांना पूज्य मानतो. या पर्यावरण प्रेमाच्या परंपरेचा पाया वनवासी समाजाने नेहमीच भक्कम ठेवला आहे.
महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावातील समाजसेवक चैत्राम पवार यांनी याच तत्त्वज्ञानाला बळ देत गेल्या तीन दशकांत एक हरित क्रांती घडवली आहे. जंगल संवर्धन, जलसंधारण, पर्यावरणपूरक शेती आणि वनवासी समाजाच्या समृद्धीसाठी त्यांनी कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पद्मश्री चैत्राम पवार हे महाराष्ट्रातील एक सामाजिक आणि वनसंजीवनी क्षेत्रात काम करणारे एक व्यक्तिमत्व आहे. त्यांना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चैत्राम पवार यांनी वन व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी जवळपास 400 हेक्टर वनक्षेत्राचे संरक्षण केले आहे. त्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्राचा पहिला वनभुषण पुरस्कार आणि 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बारीपाडा गावात विजेसह शेतीला आणि ग्रामस्थांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं, ज्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांचं जीवनमान उजळलं.
त्यांच्या या कार्याचा सन्मान एन. जी. ओ. फोरम नाशिक यांच्यामार्फत नाशिक येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित केला होता. त्यांच्या साधेपणाचे सर्वानीच कौतुक केले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित एन. जी.ओ. फोरम चे पदाधिकारी समवेत सक्सेस ग्लोबल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. नितीन सोनवणे, प्रेम फाउंडेशन नाशिक संस्थेचे अध्यक्ष श्री. राजू शिरसाठ समवेत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.