दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुक्ताई गार्डन, , धायरी पुणे येथे महिला उद्योजिका विकास मार्गदर्शन शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना (MSMEs) केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा आणि अनुदान तसे विविध प्रोत्साहन या विषयावर चर्चासत्र आयोजन केले होते.
जसे कि, देशाच्या विकासात सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांचे मोठे योगदान आहे., ज्यांना वारंवार अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून संबोधले जाते. हे उद्योग भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. स्थानिक ठिकाणी रोजगार आणून ग्रामीण आणि अविकसित समुदायांना लाभ मिळतो व उद्योगांना शासनाच्या विवध योजनांचा फायदा होतो.
नवीन स्थापन होणाऱ्या कंपनी त्या साठी आवश्यक असलेले भाग भांडवल बँकेमार्फत उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती व बँकेकडून घेतलेल्या भांडवलावर शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवावा आणि संबधित उयोगांना लागणारे आवश्यक परवानग्या बाबत सखोल मार्गदर्शन पुणे येथे आयोजित कार्यशाळेत करतांना गोदावरी कन्सल्टंट अँड सर्विसेस प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर मा. श्री. नितीन सोनवणे.
ह्या प्रसंगी कंपनी चे सहकारी श्री अजिंक्य काळे केतन कडवे आणि वैभव भावसार ह्यांनी आलेल्या महिला उद्योजकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजक माननीय पोर्णिमा madam व त्यांच्या सर्व सहकारी संस्थांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली नव उद्योजक महिलांना भरारी मिळण्यासाठी विविध उपक्रम साजरे करून उपक्रम यशस्वी केला
सदर प्रसंगी MSSIDC, MSME, Khadi India, झेप, यशस्वी स्वछंद भरारी, MSME Bharat Manch, Lokmat sakhi, Bharat Udyog Gaurav व गोदावरी कन्सल्टंट नाशिक ह्या संस्थांनी सह्भाग नोंदवला.